आपला जिल्हा

चिपळूण -संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांचा दोन दिवसीय चिपळूण दौरा संपन्न.

देवरुख:- संगमेश्वर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांनी नुकताच दोन दिवसीय चिपळूण दौरा केला.

या दौऱ्याच्या निमित्ताने चिपळूण तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी तसेच संघटनात्मक जबाबदारी असलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे येत्या गुरुवारी दि. १९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रवास दौऱ्यावर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वर विधानसभेतील प्रमुख कार्यकर्त्यांची पूर्वतयारी व अन्य संघटनात्मक बाबींसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आल्या.

या चर्चा करण्यासाठी प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याचे राजकीयदृष्ट्या असलेले महत्त्व, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक सक्षम करण्याबाबत त्यांची असणारी भूमिका विषद केली.

यासोबतच विविध पंचायत समिती गटांतील तसेच चिपळूण शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करून प्रदेशाध्यक्षांच्या संबोधनासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन श्री. प्रमोद अधटराव यांनी केले.

चिपळूण (ग्रामीण) तालुकाध्यक्ष श्री. वसंत ताम्हणकर, रत्नागिरी (उत्तर) जिल्हा उपाध्यक्ष श्री. रामदास राणे तसेच चिपळूण शहराध्यक्ष श्री. राम शिंदे याशिवाय अन्य पदाधिकारी यावेळी सोबत होते. असुर्डे, सावर्डे, चिपळूण शहर, दसपटी आदी ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका संपन्न झाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button