उद्योजक अविनाश कांबळे यांच्या वतीने साकारलेल्या कॉम्प्युटर लॅब चे उदघाटन संपन्न
चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – महाराष्ट्रीय यादव चॅ.ट्रस्ट शाखा संगमेश्वर* (मुंबई) चे उपाध्यक्ष आणि यादव समाज नागरी सहकारी पतपेढी मर्यादित चे तज्ञ संचालक उद्योजक मा.श्री.अविनाशजी कांबळे साहेब यांच्या आर्थिक योगदानातून साकारलेल्या ‘कॉम्पुटर लॅब व मुख्याध्यापक कक्षाचा’ उदघाटन सोहळा गुरुवार दि. १३ एप्रिल २०१७ रोजी सह्याद्री शिक्षण संस्थेचे पां.गो. महाडिक माध्यमिक विद्यालय, धामापूर ता.संगमेश्वर येथे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला सदर उदघाटन प्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शेखर निकम,जिल्हापरिषद सदस्य मा .श्री सहदेव बेटकर,मा .श्री कृष्णा कांबळे, श्री खातू गुरुजी, मुख्यद्यापक श्री बाडकर सर, विद्यालयाचे चेअरमन मा .श्री संभाजीशेठ महाडिक व माजी चेअरमन समाजभूषण मा. श्री सीताराम कांबळे आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा.श्री अविनाश कांबळे यांनी आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्याची अडचण लक्षात घेऊन एक चांगला आणि मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.



