आपला जिल्हा

विधी महाविद्यालयांतील रिक्त पटसंख्या असलेल्या जागा भरण्यात याव्यात युवा सेनेची मागणी

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – विधी महाविद्यालयातील रिक्त पटसंख्या जागा भरण्यात याव्यात अशी मागणी युवा सेनेने केली आहे. विविध महाराष्ट्रातील विधी महाविद्यालयात प्रवेश प्रकिया राबवण्यात आली ,काही महाराष्ट्र विध्यापिठातील विध्यार्थ्यांना नोंदणी करता आली नाही बहुतांशी महाविद्यालयात जागा रिक्त आहेत. त्याबाबत विध्यार्थ्यांच्या तक्रारी युवासेनेला प्राप्त झाल्या या तक्रारींची दखल घेत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे माजी युवा सेना सिनेट सदस्य मिलिंद साटम , माजी युवा सेना सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे ,किसन सावंत, विस्तारक अजिंक्य धात्रक, मुंबई समन्वयक शुभम शिंदे , कुलाबा विभाग अधिकारी विकास अडूळकर ,शाखा समन्वयक, गौरव पाटील, आदी पदधिकारी यांनी आयुक्त ,CET (महाराष्ट्र राज्य ) यांची भेट घेऊन यावेळी तक्रारी संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी यावसेनेची मागणी राज्य सरकार कडे ठेवू व पाठपुरावा करून विद्यार्थ्याना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button