आपला जिल्हाराजकीय

शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते रोहन बने यांचा आज वाढदिवस साजरा होणार; वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी राहणार उपस्थित

देवरुख – शिवसेना ठाकरे गटाचे संगमेश्वर- चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे संघटक, माजी जि. प. अध्यक्ष व युवानेते रोहन बने यांचा आज वाढदिवस साजरा होणार आहे. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी राहणार उपस्थित राहणार आहेत.

युवानेते रोहन बने यांच्या वाढदिवसानिमित्त देवरूख नजीकच्या साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणावर आज गुरूवारी रात्री ९. वा. अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोहन बने यांच्या वाढदिवसानिमित्त संगमेश्वर तालुका शिवसेना (ठाकरे गट) व रोहन बने मित्रमंडळातर्फे मंगळवारपासून पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य पटांगणावर शिवसेना कबड्डी प्रिमियर लिग जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा आज रात्री अंतिम सामना खेळवण्यात येणार असून स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खासदार विनायक राऊत व मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.

याचवेळी रोहन बने यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री रविंद्रजी माने, माजी आमदार सुभाष बने, आमदार राजन साळवी, ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, संगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्याशेठ बोरूकर, देवरूख शहरप्रमुख दादा शिंदे, चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, चिपळूण शहरप्रमुख शशि मोदी, महिला नेत्या नेहाताई माने, युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रद्युम्न माने आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी रोहन बने यांना शुभेच्छा देण्यासाठी या अभिष्टचिंतन सोहळ्याला तमाम शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button