प्रशांत यादव यांचा भाजपमध्ये प्रवेश ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ना. नितेश राणे, डॉ. विनय नातू यांची उपस्थिती

मुंबई – चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, उद्योजक प्रशांत यादव व त्यांच्या पत्नी सौ. स्वप्नाताई यादव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री ना. नितेश राणे, डॉ. विनय नातू यांची उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी प्रशांत यादव, सौ. स्वप्नाताई यादव, शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष बळीराम मोरे, राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, जि. प. माजी बांधकाम सभापती विजयराव देसाई, माजी जि. प. सदस्य दीप्ती महाडिक, माजी उपसभापती अनंत हरेकर, अनिल चव्हाण, मुग्धा जागुष्टे, माजी सभापती सुभाष नलावडे, माजी पं. स. सदस्य सुनील तटकरे, रघुनाथ ठसाळे, युवा विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपीले, माजी सरपंच अनिल चिले, अल्पसंख्यक सेलचे अन्वर जबले, श्री.कुवळेकर, उद्योजक, मा. सरपंच सुनील देवरुखकर, शशिकांत साळवी, जनार्दन पवार, अर्बन बँकेचे संचालक निलेश भुरण यांच्यासह 4 माजी जि. प. सदस्य,6 मा.पं. स. सदस्य, 3 उद्योजक, 3 डॉक्टर, 9 वकील 17 सरपंच, विविध सेलचे पदाधिकारी 24 ग्रा.प. सदस्य असे जवळ जवळ दोन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सरचिटणीस विनोद भाई भोबस्कर, मा. नगरसेविका रसिका देवळेकर, मा. नगरसेवक विजय चितळे,माजी शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, अमोल भोबस्कर आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



