आपला जिल्हा

पाध्ये बंधूंकडून खेड आगाराला ४ मार्गफलक सुपूर्द

संगमेश्वर - प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आगाराला हॉटेल सनराईज फुड्सच्या वतीने चार मार्गफलक वाहतूक नियंत्रक महेंद्र साळवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

संगमेश्वर तालुक्यातील मुंबई -गोवा महामार्गावरील गोळवली येथील हॉटेल सनराईज फुड्स चे मालक सचिन पाध्ये आणि योगेश पाध्ये या बंधूंनी सामाजिक बांधिलकीतून खेड आगाराला चार मार्गफलक सुपूर्द केल्याबद्दल खेड आगाराकडून तसेच संगमेश्वर परिसरातून या पाध्ये बंधूंचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button