आपला जिल्हा

चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळातर्फे तालुका स्तरीय निबंध स्पर्धा संपन्न*

चिपळूण – हिंदी दिन पखवाडा अंतर्गत चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळातर्फे चिपळूण तालुका स्तरीय हिंदी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण तालुक्यातून या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळाला. या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला .

या कार्यक्रमाचे सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन प्रेमजीभाई आसर शाळेच्या मुख्याद्यापिका सौ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. प्राथमिक गट ५ वी ते ७ वी मध्ये प्रथम -संध्या भारत राठोड (युनाइटेड इंग्लिश स्कूल चिपळूण) द्वितीय- विराट रवींद्र शिगवण(ह.भ.प.श्री.आ.बा सावंत माध्यमिक विद्यालय नायशी) तृतीय- श्रेयस चंद्रकांत

राक्षे(ह.भ.प.श्री.आ.बा.सावंत माध्यमिक विद्यालय नायशी) उतेजनार्थ – वेदांग विवेक रानडे (युनाइटेड इंग्लिश स्कूल चिपळूण) व अनन्या शिवराम चांदिवडे (ह.भ.प श्री आ.बा.सावंत माध्यमिक विद्यालय नायशी) माध्यमिक गट ८ वी १० वी – प्रथम क्रमांक – स्वरा मिलिंद विखारे (युनाइटेड इंग्लिश स्कूल चिपळूण)द्वितीय – ईशा एकनाथ निकम (न्यू इंग्लिश स्कुल तळसर)तृतीय- तृणाली दत्ताराम शिगवण (सुमन विद्यालय टेरव ) उत्तेजनार्थ – स्पृहा प्रमोद पवार (शा.ल.निकम माध्यमिक विद्यालय कोसबी फुरूस) व पायल दीपक पड्याळ (श्री आर आर शिंदे माध्यमिक विद्यालय ओवळी नांदिवसे). या यशस्वी विद्यार्थ्यांना सौ नाईक मॅडम यांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्या अध्यक्षा सलीमा नदाफ, उपाध्यक्ष मानसी पेढांबकर व राजेश माळी, सचिव निलेश नागे व सहसचिव सचिन पोकळे ,सौ. श्रद्धा भेंडाले व सर्व सदस्यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले . या कार्यक्रमासाठी युनायटेड इंग्लिश स्कूलचे चित्रकला शिक्षक श्री.कदम यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ उज्ज्वला लोखंडे व आभार श्री सचिन पोकळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button