आपला जिल्हा
राष्ट्रवादी कॅांग्रेसचे ( शरद पवार गट ) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी दिली चिपळूण कार्यालयाला भेट

चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी आज दुपारी चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या वतीने काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी सुदेश मयेकर यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश शिवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष कदम, श्रीनाथ खेडेकर, रोहन चौधरी, चिपळूण शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश दाते, सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, प्रशांत यादव यांचे स्वीय सहायक गुलजार गोलंदाज आदी उपस्थित होते.



