आपला जिल्हा

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतले देवरूखचा राजाचे दर्शन

रत्नागिरी – जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज मंगळवारी देवरूख येथे भेट देत देवरूखचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत देवरूखचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार उपस्थित होते.

जयहनुमान मित्र मंडळ, देवरूख व देवरूख पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने दरवर्षी देवरूखचा राजा गणरायाची हनुमान मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येते. २१ दिवसांच्या या बाप्पाची नवसाला पावणारा गणपती अशी संंगमेश्वर तालुक्यात ओळख आहे. २१ दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात आजपर्यंत भजन, टिपरी नृत्य, नेत्रतपासणी शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आहेत. उर्वरीत दिवसातही विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देवरूख येथील या गणरायाचे आज मंगळवारी दर्शन घेतले. यावेळी जय हनुमान मित्रमंडळातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष निनाद घडशी, राजू वणकुद्रे, प्रसाद कांगणे, प्रभाकर घडशी, अवधूत घडशी, कैलास घडशी, पोलीस कर्मचारी सचिन पवार आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button