आपला जिल्हा

धामापूर तर्फे संगमेश्वर भडवळेवाडी येथील ग्रामस्थांनी आ.शेखर निकम यांचे मानले आभार ; धामापूर भडवळेवाडी रस्त्यासाठी १५ लाखांचा निधी मंजूर

संगमेश्वर - विलास गुरव

संगमेश्वर – तालुक्यातील मौजे धामापूर तर्फे संगमेश्वर भडवळेवाडी येथील ग्रामस्थांनी भडवळेवाडी येथील रस्त्याची परिस्थितीत अत्यंत खराब झाल्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी आमदार शेखर निकम यांचेकडे केली होती. रस्त्याची एकंदरीत परिस्थिती पाहता ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १० लाख व २५१५ योजनेंतर्गत ५ लाख असा एकूण १५ लाखांचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला. रस्त्यासाठी १५ लाखांचा निधी मंजूर केल्याबद्दल धामापूर भडवळेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात जावून त्यांची भेट घेवून आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हा उपाध्यक्ष सुशिल भायजे, गावकर चंद्रकांत शिगवण, दिपक शिगवण, शेखर उकार्डे-सरपंच आंबव, प्रतिकेश शिगवण, शांताराम शिगवण, शिवराम शिगवण, अंकुश पालकर, शांताराम गोमाणे, भरत रामाणे, विनोद मांडरकर, विजय सुवरे, रविंद्र गुरव आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button