स्वच्छता अभियानात तरी संगमेश्वर बसस्थानकातील स्वच्छता करावी यासाठी खाडीभागातील युवकांची स्थानकात धडक.
देवरुख - सुरेश सप्रे

देवरूख – संगमेश्वर एस. टी. बस स्थानकातील स्वच्छ्ता गृह व परिसरातील अस्वच्छतेने सर्व परिसरात दुर्गंधी येते असून हि वांरवार तक्रारी करून हि एसटी महामंडळाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याने या गलथान कारभार बाबत संगमेश्वर बस स्थानक येथे डिंगणी चे सरपंच मिथुन निकम. सुभेदार फौंडेशन चे सुधीर चाळके, दिपक चाळके यांच्या नेतृत्वाखाली खाडी भागातील युवकांनी धडक देऊन प्रशासनाच्या स्वच्छ्ता गृहाच्या स्वच्छतेच्या बाबतीत असणाऱ्या समस्या दाखवून त्यावर त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी करून येत्या १ आँक्टोबरला देश पातळीवर सुरू होणाऱ्या स्वच्छता अभियानाचे औचित्य साधून हि दुर्गंधी समुळ नष्ट करून जनतेला बसस्थानकात मोकळा श्वास घेता यावा यासाठी येत्या 2 दिवसात सर्व समस्या ठेकेदाराकडून वा प्रशासनाने मार्गी लावण्यात प्राधान्य द्यावे तसे न केल्यास बसस्थानकावर धडक देवून सर्व परिसर व स्वच्छता गृहात असलेली सर्व घाण स्वयंस्फूर्तीने दूर करू ती दुर्गंधी युक्त घाण कंट्रोल केबिनमधे टाकू असे ठणकावून सांगण्यात आले. यावर दोन दिवसात सर्व परिसर स्वच्छ करू असे प्रशासनाच्या तीने सांगितले गेले. या वेळी युवा नेते मिथुन निकम, सुधीर चाळके, दिपक चाळके, मयूर निकम, जयकुमार चाळके, मुरलीधर चाळके यांचे सह खाडीपरिसरातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते.



