भाजपची २९ सप्टेंबर ला लांजा या ठिकाणी पदाधिकारी – कार्यकर्ता बैठक ; बैठकीला पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांचे आवाहन

लांजा – सध्या राज्यात भाजपकडून महाविजय २०२४ हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे या अभियानाद्वारे बुथ केंद्र, शक्ती केंद्र, तालुका, जिल्हा सर्वच स्तरावर भाजप सक्षम करण्याचा प्रदेशाध्यक्षांचा प्रयत्न असून २०२४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत जास्त आमदार व खासदार निवडूण आणण्याचे लक्ष या अभियानाद्वारे ठेवण्यात आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ८ अॅाक्टोबर २०२३ च्या मतदारसंघातील दौ-याच्या अनुषंगाने लांजा शहनाई हॅाल या ठिकाणी २९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करणायात आली असून या बैठकीला महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रत्नागिरी – सिंधूदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत उपस्थित राहणार आहेत. जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शक्तीकेंद्र, बुथ अध्यक्ष, बुथ पालक, मंडल अध्यक्ष आदींनी उपस्थित रहावे असे आवाहन राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा निवडणूक सह प्रमुख उल्का विश्वासराव यांनी केले आहे.



