आपला जिल्हा

घाटकोपर ( मुंबई ) रामबाण क्रिडा मंडळाच्या हीरक महोत्सवानिमित्त आमदार शेखर निकम यांची भेट ; मंडळाला शुभेच्छा देत घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई – रामबाण क्रीडा मंडळ श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घाटकोपर यंदा या मंडळाचे हिरक महोत्सवी वर्ष होते.60 वर्षा पुर्वी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ यांनी घाटकोपर या ठिकाणी सुरवात केली.गेली 60 वर्षे दहिकाला उत्सव , शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव साजरे करत महामुंबईत आपली कोकणी परंपरा या मंडळाने जपली आहे. क्रीडा क्षेत्रात ईशान्य मुंबई त या मंडळाच्या कबड्डी संघाने आपला ठसा उमटविला आहे. गेली 25 वर्ष अविरतपणे रक्तदान शिबीर , गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपा सारखे उपक्रम मंडळ राबवित असते. या वर्षी हीरक महोत्सवी वर्षा निमित्त उपस्थित राहून गणरायाचे आशीर्वाद घेताना चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम* तसेच राजश्री धाम प्रतिष्ठान घाटकोपर या सुद्धा कोकणवासीयांच्या मंडळाला भेट दिली या वेळी मंडळाचे *अध्यक्ष चंद्रकांत पाष्ठे, सचिव कृष्णा चाळके, नितीन सालप , जगन्नाथ रेवाळे,आनंद शिवगण,किरण कटम,खजिनदार दिनेश शेजवळ,चंद्रकांत गुजर, गणेश चाळके,एकनाथ गावडे आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Back to top button