गणेशोत्सव निमित्त ‘मु.पोस्ट.चंद्रप्रस्थ’ वनाझ परिवार विद्या मंदिर शाळेत देखावा साकारण्यात आला
पुणे - विलास गुरव

पुणे – पुणे येथील कोथरूड वनाझ परिवार विद्या मंदिर “चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची”
हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच! पण प्रत्यक्षात चांदोबा वरती गाव वसवलं तर कसं दिसेल ! त्याचा प्रत्यक्ष अनुभव आमच्या शाळेतील मुलांना यावर्षी गणपती सुशोभनाच्या माध्यमातून देण्यात आला.
“चला चांदोबाच्या गावाला”असे म्हणत मुक्काम पोस्ट “चंद्रप्रस्थ” या कल्पनेतील गावात यावर्षी आम्ही पोहोचलो होतो. गणेशोत्सवासाठी चंद्रावरील गाव ही थीम घेऊन मु. पोस्ट चंद्रप्रस्थ हे नाव गावाला दिले होते.
वनाझ परिवार शिक्षण मंडळाचे परिवार विद्या मंदिर या शाळेत हा देखावा साकारण्यात आला होता.
शाळेतील सर्व विभागाच्या मा.मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी या देखाव्यासाठी लागणारे साहित्य बनवले .शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठा हातभार यासाठी लागला.
यामध्ये चंद्रयान -3, अवकाश, चांदण्या, मेट्रो, घर,शाळा, हॉटेल, माणसे , तसेच रांगोळीच्या माध्यमातून चंद्र दाखवण्यात आला होता.
शिक्षक श्री. कोकाटे सर यांनी बसवलेल्या अतिशय सुंदर अशा लेझीमच्या तालावरती वनाझ परिवार शिक्षण मंडळाचे मा. सचिव श्री. वाय के कदम यांच्या हस्ते श्री.गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणपती बाप्पांची आरती मान्यवरांच्या हस्ते विविध दिवशी घेण्यात आली. यामध्ये शाळेच्या माननीय अध्यक्षा रजनी दाते, वनाझ कामगार संघटनेचे पदाधिकारी, यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्षाचे पठण केले.
हा सर्व देखावा पाहून विद्यार्थ्यांनी एक वेगळा अनुभव घेतला. सर्वांनी त्या देखाव्याचे कौतुक केले.
पर्यावरण पूरक गणेशमूर्ती चे विसर्जन शाळेतच करून बाप्पांना निरोप देण्यात आला.
अशाप्रकारे सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका या.सौ. अनिता दारवटकर, सौ. शितल देशमुख, सौ. वृषाली वाशिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेला या देखावा तसेच गणेशोत्सव अतिशय आनंदात व उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.



