आपला जिल्हा

कडवईत वानरांचा उच्छाद; महिलांवर हल्ले करण्याचे प्रकार ; वन विभागाने वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी

संगमेश्वर - सचिन यादव

संगमेश्वर – तालुक्यातील कडवई येथे गेले काही दिवस एक वानराने उच्छाद मांडला आहे .याबाबतची कल्पना तंटामुक्त समिती अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी तात्काळ वन विभागाला दिली असून वनविभागा कडून ही प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली आहे .

कडवई बाजारपेठ परिसरात गेले अनेक दिवस एक वानर बिंनधास्तपणे वावरत असल्याचे दिसून येते. महिलांवर अचानकपणे हल्ला करण्याचे प्रकार या वानरांकडून सुरू आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये विशेषतः महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे .

याबाबतची माहिती काही ग्रामस्थानी तंटामुक समिती अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांना दिली . चव्हाण यांनी तात्काळ वनक्षेत्रपाल तौफिक मुल्ला यांना याबाबतची माहिती दिली .

त्यानंतर तात्काळ वनविभागाचे वनपाल कडुकर यांनी कडवई येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली व हल्ला झालेल्या महिलेची भेट घेतली मात्र महिलेला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगितले .

वनविभागाने सदर वानराला लवकरात लवकर पकडून ग्रामस्थांची भीती दूर करावी अशी मागणी होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Back to top button