आपला जिल्हा

पुर्ये तर्फे देवळे येथे स्ट्रीट लाईट बसवणे कामाचे भूमिपूजन संपन्न ; उपसरपंच बापू लोटणकर यांचे विशेष प्रयत्न

साखरपा- संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे येथे स्ट्रीट लाईट बसवणे कामाचे भूमिपूजन आज शुक्रवारी गावचे गावकर तानाजी गोरूले यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यासाठी उपसरपंच बापू लोटणकर यांनी विशेष प्रयत्न केले.

माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत व माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम यांनी दिलेल्या शिफारशींनुसार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिलेल्या पुर्ये तर्फे देवळे येथे रस्त्याला स्ट्रीट लाईट बसविणे या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. पुर्ये पूल ते शिंदेवाडीपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी ६ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत. यावेळी सरपंच शीतल गार्डी, उपसरपंच बापू लोटणकर, संजय सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार, चंद्रकांत पवार, अमित केतकर, अशोक पवार, वसंत पवार, सुरेश चव्हाण, शंकर वैद्य, भरत गोरूले, उमेश कारेकर, संभाजी गुरव व सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button