आपला जिल्हा

सामाजिक ; संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान कोळकेवाडी – पठारवाडी दहीहंडी उत्सवासाठी माजी सभापती धनश्री शिंदे यांच्याकडून टीशर्टस् चे वाटप ; दहीहंडी उत्सवाला १०१ वर्ष पूर्ण

चिपळूण – तालुक्यातील कोळकेवाडी पठारवाडी येथील संत तुकाराम महाराज दहीहंडी मंडळाला या वर्षी १०१ वर्षे पुर्ण होत आहेत. या मंडळांचे गोविंदा पुण्यात कोंढवा, सिंहगड, पर्वती आदी परीसरात जावून हंडी फोडून दहीहंडी सण साजरा करतात त्यांच्या मंडळाला चिपळूण पंचायत समिती माजी सभापती धनश्री शिंदे यांच्याकडून दरवर्षी शाबासकी ची थाप दिली जाते व सर्वोतपरी सहकार्य केले जाते. माजी सभापती धनश्री शिंदे यांनी यावर्षी रत्नागिरी – सिंदुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत व माजी सभापती धनश्री शिंदे यांची नावे असलेली २०० टिशर्टस या मंडळाला दिली आहेत. मंडळाच्या वतीने माजी सभापती धनश्री शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर माजी सभापती धनश्री शिंदे यांनी ही मंडळातील सर्व युवा कार्यकर्त्यांना दहिहंडीच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यभरात ७ अॅागस्ट २०२३ रोजी गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा होणार असून या उत्सवात चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी – पठारवाडीतील संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान ची दोन पथके पुण्यात दाखल होवून पुणे शहरातील हंड्या फोडण्याचे काम करणार आहे. संत तुाकारम महाराज दहीहंडी उत्सव समितीमधील युवा कार्यकर्ते गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने पुण्यात जावून हंड्या फोडण्याचे काम करत आहेत. ग्रामीण भागातील मंडळाने पुणे सारख्या शहरात जावून हंडी फोडणे ही दुर्मिळ घटना असून या मंडळांचे कौतुक होत आहे. माजी सभापती धनश्री शिंदे यांनी यांनी टिशर्टस वाटप कार्यक्रमात या मंडळांचे खुप कौतुक करत शाबासकीची थाप दिली. आजच्या दि.३१ अॅागस्ट च्या आयोजित कार्यक्रमाला मंडळांचे अध्यक्ष नरेश राणे, शिवाजी निगडे, प्रमोद राणे, नारायण पांगळे, संतोष राणे, संभाजी निगडे, सुमित राणे, महादेव चांडीवडे, सुरेश पांगळे, रामचंद्र कोठरी, धिरज निगडे, रघुनाथ पिलावरे आणि मंडळातील इतर पदाधिकारी आणि गोविंदा उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button