आपला जिल्हा

डिंगणीत शिवसैनिकांनी श्रमदानातून स्मशान शेडची केली दुरूस्ती

देवरुख - सुरेश सप्रे

संगमेश्वर – तालुक्यातील डिंगणी गावात तीन वाड्यांची असलेली स्मशान शेड मोडकळीस आली होती. त्या स्मशानभुमीतील अडचण लक्षात घेऊन गावातील शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून श्रमदान करून तात्काळ दुरुस्ती करून देत जनतेची चांगली सोय केली

डिंगणीतील स्मशान शेड जीर्ण झाली होती. सदर ची शेड दुरुस्ती व्हावी या साठी ग्रामस्थ्यांची मागणी होती तसेच पावसाळी हंगाम असल्यामुळे तेथे कोणती ही आकस्मिक घटना झालीच तर तिथे पावसमुळे गैरसोय होऊ नये यासाठी शिवसैनिकांनी त्याची तात्काळ तात्पुरती दुरुस्ती करून मोठी गैरसोय दूर केली आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या आशीर्वादाने उपजिल्हा प्रमुख राजेश मुकादम, तालुका प्रमुख प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके, डिंगणी सरपंच समीरा खान, शाखा प्रमुख विशाल कदम,तंटामुक्ती अध्यक्ष भगवान खाडे, गावकर वामन काष्टे,योगेश खाडे, सचिन राऊत यांच्या श्रमदानातून हे काम पूर्णत्वास गेले.

८० % समाजकारण आणि २०% राजकारण या ब्रीद वाक्याप्रमाणे शिवसेना संघटना फक्त राजकीय पक्ष नसून सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना आहे. हे दाखवून दिले आहे. युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके आणि शिवसेना शाखा डिंगणी यांच्या श्रमदानातून या कामाच्या माध्यमातून समाजाला ऐक चांगला संदेश दिला. शेडचे काम त्वरीत करून सोय केल्याबद्दल ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button