आपला जिल्हा

देवरुख ग्रामीण रुग्णालय नवीन इमारत बांधकामाची आमदार शेखर निकम यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

देवरुख- देवरुख ग्रामीण रुग्णालय जूनी इमारत जीर्ण झाली होती. देवरूख व आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा विचार करता आणि रुग्णांना उत्तम प्रकारे सेवा मिळण्याकरीता सोयी-सुविधेने सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय होणे आवश्यक होते. त्यानुसार देवरुख ग्रामीण रुग्णालयाची इमारत मंजूर देखील मंजूर झाली व त्या इमारतीची बांधकाम जवळ जवळ पुर्ण झाले आहे.

मात्र या इमारतीचे निधी अभावी तीस-या मजल्याचे बांधकाम अपुर्ण स्थितीत आहे तसेच ड्रेनज व्यवस्थेबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेत आमदार शेखर निकम यांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधून निधी प्राप्त होणेबाबत सुचना केल्या व देवरुख ग्रामिण रुग्णालय सुसज्ज सोयी-सुविधानी पुर्ण होणेसाठी प्रयत्नशील राहीन असा ग्रामस्थांना शब्द दिला.

यावेळी कनिष्ठ अभियंता एन.एच.एम. जिल्हा परिषद विजया भालेकर, कर्यकारी अभियंता विद्युत एन.एच.एम. राहुल कांबळे, आकाश लेंडे, हेमंत तांबे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, प्रफुल्ल भुवड, निखील कोळवणकर, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, बंडू जाधव, नितीन भोसले, रामचंद्र पंदेरे, प्रदिप कांबळे, राजू वणकुंद्रे, मंगेश बांडागळे, संकेत खामकर, विकास राठोड व संबंधित अधिकारी व कार्यकर्ते इ. उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button