आपला जिल्हानिधन
पत्रकार ओंकार रेळेकर यांना पितृशोक

चिपळूण – शहरातील पत्रकार ओंकार
रेळेकर यांचे वडील नंदकुमार जगन्नाथ रेळेकर यांचे
अल्पशा आजाराने बुधवारी संध्याकाळी निधन
झाले. मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते. गुरुवारी
सकाळी रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर
अंत्यसंस्कार झाले. नंदकुमार रेळेकर हे मूळचे म्हसळा-रायगड येथील रहिवासी होते. गेली ४० वर्षे ते चिपळूण येथे टेलरिंगचा व्यवसाय करीत होते. त्यामुळे ते सर्व परिचित होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.



