आपला जिल्हा

कडवई येथे स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात साजरा

संगमेश्वर - सचिन यादव

संगमेश्वर – तालुक्यातील कडवई येथे स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कडवई बाजारपेठ येथे सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या हस्ते सार्वजनिक झेंडावंदन करण्यात आले . तर रिक्षा संघटनेच्या वतीने कडवई तुरळ चिखली अशी प्रभात फेरी काढण्यात आली . युवा उधोजक सिद्धेश ब्रीद यांनी सर्व ग्रामस्थाना व विध्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप केले .

कडवई येथे स्वातंत्र दिन नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले होते चिखली येथून निघालेली ही रिक्षा ची प्रभातफेरी कडवई करून तुरळ व परत कडवई असा प्रवास करुन कडवई बाजारपेठ येथे सार्वजनिक झेंडावंदनात सहभागी झाली . प्रभात फेरीत ९६ रिक्षा सहभागी होत्या . प्रभातफेरी च्या अग्रभागी ध्वनीक्षेपकव्दारे देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती त्यामुळे वातावरणात उत्साह निर्माण झाला होता .

कडवई बाजारपेठ येथे सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या हस्ते सार्वजनिक झेंडावनदन करण्यात आले . यावेळी भाईशा घोसाळकर हायस्कुल , महाराष्ट्र उर्दू हायस्कुल व इंग्लिश मिडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांनि देशभक्तीपर गीते सादर केली .या कार्यक्रमात विद्यार्थी , ग्रामस्थ व रिक्षा व्यावसाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद यांनी उपस्थित सर्व नागरिक व विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप केले .हरयाली फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

अशाप्रकारे विविध उपक्रमाच्या माध्यमातून कडवईत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Back to top button