आपला जिल्हा

संगमेश्वर शिवसेना ( उबाठा) पक्षाच्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमाची कडवई जिल्हा परिषद गटातून सुरवात

जनतेचा शासनाच्या विरोधात आक्रोश, मतदानाद्वारे धडा शिकवण्याचा निर्धार

संगमेश्वर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी -सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व तालुका संघटक संतोष थेराडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कडवई जिल्हा परिषद गटाच्या वतीने तूरळ ( संगमेश्वर ) येथे “होऊ द्या चर्चा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने यांची उपस्थिती लाभली.

यावेळी शासनाच्या बोलघेवढ्या योजनांचा भांडाफोड करण्यात आला. यामध्ये बंद होत असलेल्या जिल्हा परिषद शाळा, कंत्राटी क्षिक्षक भरती, सरकार आपल्या दारी सांगून कोणत्याही गोष्टी निर्धारित वेळेत न मिळणे आणि त्यातून सर्वसामान्यांना होणारा त्रास, वाढती महागाई, पेट्रोल -डिझेल दरवाढ, वाढती बेरोजगारी आणि फसव्या योजना यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

या कार्यक्रमाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा संघटक रोहन बने, महिला जिल्हा संघटक वेदाताई फडके, महिला उपजिल्हा संघटक ऐश्वर्याताई घोसाळकर, महिला संपर्क प्रमुख खेडेकर, महिला विधानसभा संघटक स्वातीताई देवळेकर, सभापती दिलीप सावंत, विभाग प्रमुख अनंतजी उजगावकर, उपविभागप्रमुख अरविंदजी जाधव, विकास सुर्वे सर, युवासेना उपतालुकाधिकारी सागर भोजने, चिपळूण युवासेना उपशहराधिकारी श्री. संकेत थेराडे, युवासेना विभागधिकारी अजिंक्य ब्रीद, तुरळ सरपंच श्री. सहदेव सुवरे, कडवई सरपंच विशाखाताई कुवळेकर, कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे, तूरळ उपसरपंच अनंत पाचकले, शाखाप्रमुख श्री. शांताराम आदवडे, तुकाराम येलोंढे, विष्णू विंजले,महेंद्र दुदम,सुजित पंडव, ग्रा. पं. सदस्य रामचंद्रजी हरेकर, श्री. संजयजी कडवईकर, सिद्धार्थ मोहिते, विनायक गुरव,अंकिता घरवेकर, पत्रकार रमेश डिके,बाळकृष्ण डिके,अनिस खान, सुरेश चव्हाण,रघुनाथ बामणे,काशिनाथ हरेकर, काशीराम पाचकले, कौस्तुभ मयेकर,बाबू कुंभार सर्व ग्रा. पं. सदस्य, सर्व शिवसेना शाखाप्रमुख, गावकर मंडळी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा फडकले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button