आपला जिल्हाकोरोना

मंगलादीप एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या महिलेची हॅन्डबॅग चोरट्यांनी रत्नागिरी स्थानकाजवळ लांबविली

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरील मंगलादीप एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या महिलेची हॅन्डबॅग चोरट्यांनी लांबवली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६. च्या सुमारास घडली. इंदुलेखा मेनॉन (५४) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुलेखा मेनॉन या ८ ऑगस्ट २०२३ मंगलदीप एक्सप्रेस गाडीमधून प्रवास करत होत्या. गाडी संकाळी ६ च्या

सुमाराला रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली. यावेळी इंदुलेखा यांच्या झोपेचा फायदा उठवत चोरट्यांनी त्यांची हॅन्डबॅग लांबवली. बॅगमध्ये १० हजाराची रोख रक्कम, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, २० ग्रॅम सोन्याचे दागिने, बांगड्या आदी १ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला, अशी तक्रार ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button