डीबीजेत प्रतिबिंब अंकाचे प्रकाशन

चिपळूण – येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘ प्रतिबिंब ‘अंकाचे प्रकाशन डीबीजे महाविद्यालयाचे माजी मराठी विषयाचे प्राध्यापक विनायक होमकळस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, मराठी विभाग प्रमुख प्रा. गिरीराज पांडे सर उपस्थित होते.
निसर्गकवी, रानकवी, ना, धो.महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, संपादक म्हणून प्राची तांबे हिने प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यातील सर्जनशीलता व लेखन कलेला वाव मिळावा यासाठी मराठी विभागाने ‘प्रतिबिंब, हा हस्तलिखित अंक सुरू केला आहे, यामध्ये विद्यार्थी कथा, कविता, वैचारिक लेखन करत असतात.या वर्षी शिक्षणाचे महत्त्व ,परीक्षा- गुण व मार्क्स यावर आधारित विद्यार्थ्यांनी लेखन केले आहे. अशा प्रतिबिंब अंकाचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक विनायक होमकळस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये दर्जेदार लेखन करायचे असेल तर दर्जेदार वाचले पाहिजे. कविता सहज लिहिता आली पाहिजे. यावेळी पाडगावकर, कवी ग्रेस, बा. सी. मर्ढेकर यांच्या उत्तम कविता सरांनी म्हणून दाखविल्या. प्रतिबिंब मध्ये लिहिणाऱ्या सर्व लेखकांचे कौतुक केले. उपप्राचार्य प्रा. तळपसर यांनी यांनी आपल्या मनोगतात मराठी विभागाने हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेला वाव मिळत आहे. असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. तर प्राचार्य बापट सर यांनी मराठी विभागाने सुरू केलेल्या अंकाचे कौतुक केले व भविष्यात असे अंक तयार करून विद्यार्थ्यांनी आपली कलासक्त मन जोपासावे अशा भावना व्यक्त केल्या.



