आपला जिल्हाताज्या घडामोडी

तीन किमी चालत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी कातकरी-आदिवासी वस्तीला दिली भेट

गुहागर तालुक्यातील गिमवीमधील दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर डोंगर-दऱ्यांतून सुमारे ३ कि. मी. अंतर चालून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी भेट दिली. साक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या पहील्याच भेटीने आदिवासी वस्तीने मोठ्या जल्लोषात स्वागत केले. महसूल सप्ताह १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याच सप्ताहाच्या अनुषंगाने जनसंवाद या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गुहागर तालुक्यातील गिमवी या गावच्या दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर जावून तेथील कातकरी – आदिवासी बांधवांशी दिलखुलास संवाद साधला. दुर्गम व आदिवासी वस्तीतीवरील एक अविस्मरणीय अनुभव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला. जनतेच्या समस्या, मुलभूत गरजा जाणून घेतल्या. रेशनकार्ड, जमिनीचा ७/१२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, उत्पन्नाचे दाखले आदी महत्त्वाचे शासकीय दस्तऐवजांचे वितरण यावेळी करण्यात आले.

या आदिवासी वाडीतील गुणवंत व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button