सत्ता परीवर्तनात संगमेश्वर धनगर समाजाची आमदार शेखर निकम यांना टाळी
देवरुख येथील समाज भवन सप्टेंबर २०२३ पर्यंत समाजासाठी खुले करणार - आमदार शेखर निकम.

देवरुख – सत्ता परीवर्तनात संगमेश्वर तालुक्यातील धनगर समाजाने आपल्या पाठीशी उभे रहावे म्हणून चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी १४ जुलै रोजी संगमेश्वर तालुक्याती धनगर समाज प्रमुख पदाधिका-यांना निमंत्रीत केले होते. आमदार शेखर निकम यांच्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्याती बहुतांश धनगरवाड्यांमधील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. धनगरवाड्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार शेखर निकम यांनी दिले. तर देवरुख येथील समाज भवनाचे काम पुर्ण करुन सप्टेंबर २०२३ पर्यंत हे समाज भवन बांधवांसाठी खुले करुन देणार असल्याचे आमदा शेखर निकम यांनी यावेळी सांगितले.
संगमेश्वर तालु्क्यातील धनगर समाजातील समाज बांधवांना संबोधित करताना आमदार शेखर निकम यांनी धनगर समाजाने आपल्या पाठीशी रहावे अशी टाळी मागितली असता उपस्थित पदाधिका-यांनी आमदार शेखर निकम यांना पाठींबा दर्शवित आमदार शेखर निकम यांना टाळी दिली.
२ जुलै २०२३ रोजी राज्यात अनपेक्षित सत्ता परीवर्तन झाले राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार काही आमदारांसह थेट सत्तेत सामील झाले. चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम हे अजित दादा यांच्या गटात सामील झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ही दोन गट निर्माण झाले राषट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन गटातील जिल्ह्यातील चित्र अजून अस्पष्ट असून उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झालेल्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी मात्र चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदार संघात मोर्चे बांधणी सुरु केली असून विविध स्तरावरील पदाधिकारी आणि संघटना यांच्या सोबत जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे.



