युवासेनेचा दणक्याने मुंबई विद्यापीठ ठाणे उपकेंद्रास स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे नाव देण्यात आले.
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्यांनी मागणी केली होती वर्ष २०१८ ते २०२२ पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत काम करीत असता अनेक निर्णय घेण्यात आले त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे नाव देण्याचा ठराव व्यवस्थापन परिषद सभेमध्ये मंजूर करण्यात आला परंतु सदर केंद्राच्या दुरावस्थेबाबत काही विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन पाहणी करण्यास गेलो असता कुठेही नामकरण केल्याचे दिसले नाही म्हणुन कुलगुरु आणि प्र कुलगुरु यांना निवेदन देऊन त्वरीत नामकरण सोहळा करावा अथवा युवासेना हा कार्यक्रम हाती घेईल असा इशारा दिला असता २४ तासात नामफलक लावण्यात आला, व्यवस्थापन परिषद सभेमध्ये हा प्रस्ताव चर्चेला आला तेव्हा काही भाजपा प्रणित सदस्यांनी विरोध करुन रामभाऊ म्हाळगी यांचे नाव देण्याची मागणी करीत होते परंतु दिघे साहेबांचे ठाणे जिल्ह्याच्या विकासात असलेले अनमोल योगदान आणि एकनिष्ठताया मुद्द्यांवरून युवासेना सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी जोरदार मागणी करुन हा प्रस्ताव मंजुर करुन घेतला होता, कार्यकाळ संपल्यामुळे आणि राजकीय उलथापालथ झाल्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते,परंतु इशरावजा निवेदन दिल्यानंतर कुलगुरु प्रा.डॉ.रविंद्र कुळकर्णी आणि मान.प्र कुलगुरु डॉ.अजय भामरे यांनी केंद्राच्या दुरावस्थेची पाहणी करण्यास भेट दिली असता युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत,शशिकांत झोरे आणि शितल शेठ उपस्थित होते तेव्हा नामफलक निदर्शनास आले. दिघेसाहेब यांच्या नावाला विरोध करणाऱ्या भाजपा सोबत दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करणारे आज मांडीला मांडी लावून सरकार मध्ये बसले आहेत असा आरोप सिनेट सदस्यांनी यावेळी केला



