अपघातआपला जिल्हाताज्या घडामोडी
लोवले बौध्दवाडीजवळील जुनाट झाड कोसळले ; वाडीतील विजपुरवठा खंडीत

संगमेश्वर – तालुक्यातील लोवले बौध्दवाडी जवळ देवरहाटीत सुकलेल धोकादायक झाड आज अखेर खाली पडले यामध्ये कोणतीही जीवीत हानी वा वित्त हानी झाललेली नाही मात्र विधुत खांब मोडून विद्युत लाईन तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात १९ जुलै २०२३ रोजी मुसळधार पाऊस पडला जिल्ह्यात विविध ठिकाणी पुरसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती तर काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले होते सध्या जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी सततच्या पावसामुळे लोवले येथील जुनाट झाड कोसळून विद्युत खांब पडले या ठिकाणी जीवित अथवा वित्त हानी झाला नसून बौध्दवाडीचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.



