आपला जिल्हाक्राईम
संगमेश्वर रेल्वे स्टेशन जवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला ; ओळख पटवण्याचे काम सुरू…

संगमेश्वर रेल्वे स्थानक येथे अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून त्यामुळे खळबळ उडालेली आहे. सदरचा मृतदेह शुक्रवारी 8 वा.45 दरम्याने आढळून आलेला आहे.
याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या जवळ एक अनोळखी पुरुष मृतदेह वय 25 ते 30 वर्षे, दरम्यान उंची पाच फूट पाच इंच, वर्ण निमगोरा, डोक्यावर केस, बारीक अंगात लालसर चॉकलेट रंगाचा हाफ शर्ट असून सदर इसमाची अजूनही ओळख पटलेली नसून संगमेश्वर पोलीस तपास करत आहेत.
याबाबत कोणालाही अधिक माहिती असल्यास संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संगमेश्वर पोलीस यांनी केले आहे..



