आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

वारजे माळवाडी येथील यशोदीप माध्यमिक विद्यालयात मातृ-पितृ पूजन कार्यक्रम उत्साहात साजरा.

पुणे - विलास गुरव

पुणे – यशोदीप माध्यमिक विद्यालयात मातृ-पितृ पूजनाचा कार्यक्रम विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला. माता ,पिता व गुरुजन यांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. त्यांच्या ऋणात राहूनच त्यांची सेवा प्रत्येकाने करायला हवी असे मत यशोदीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय शिखरे यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्याध्यापक अजय शिखरे पुढे म्हणाले,” प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यालयात रोज येताना आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत. त्यांचा आशीर्वाद आपल्या प्रत्येक कृतीला ,आपल्या ध्येयाला व आपल्या इच्छेला बळ देत असतो.” असेही ते म्हणाले.मातृ-पितृ पूजन कार्यक्रमासाठी ह.भ. प. स्वप्निल महाराज कळाणे यांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना विशेष मार्गदर्शन केले. व हा सोहळा अत्यंत दिमागदार केला.

मातृ-पितृ पूजनानंतर मुले व मुली आणि त्यांचे माता- पिता अत्यंत भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये आसवं जमा झाली होती. पाल्यांनी आपल्या पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

शेकडो विद्यार्थी आपल्या माते चे किंवा पित्याचे पूजन करण्याचे दृश्य केवळ विलोभनीय नव्हे तर हृदयस्पर्शी होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक व्यंकटेश देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका वंदना पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button