आपला जिल्हा

गडनदी प्रकल्पबाधीत राजिवली बौध्दवाडी समाज मंदीरासाठी निधी मिळावा पंचशील विकास मंडळांचे आमदार शेखर निकम यांना निवेदन.

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली बौध्दवाडी येथील बौध्दविहार समाज मंदीरासाठी निधी मिळावा या मागणीसाठी पंचशील विकास मंडळाच्या पदाधिका-यांनी आमदार शेखर निकम यांची सावर्डे येथील कार्यालयात भेट घेत त्यांना निवेदन दिले यावेळी खरी लोकजागृती चे संपादक संतोष येडगे, राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे, राष्ट्रवादीचे सुधीर राजेशिर्के, आमदार शेखर निकम यांचे स्वीय सहाय्यक संजय कदम, राजिवली ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाडगे, पंचशील मंडळांचे सल्लागार रविंद्र कदम, पंचशील मंडळांचे अध्यक्ष तथा राजिवली तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण कदम, मंडळाचे सरचिटणीस किरण कदम, राजेंद्र जाधव, उपचिटणीस सचिन कदम, पोलिस पाटील संदीप कदम, उप सचिव विजय कदम, संजय कदम, भिवराम कदम, प्रकाश कदम, श्रीपत कदम, मंगेश कदम, संदेश कदम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राजिवली बौध्दवाडीचे गडनदी धरणामुळे स्वेच्छा पुनर्वसन करण्यात आले होते. पुनर्वसन नंतर त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून मंडळाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. नविन पुनर्वस गावठाणात दिमाखदार समाजमंदीर उभारण्याचा संकल्प पंचशील मंडळाचा असून या समाजमंदीरासाठी आवश्यक निधीसाठी मंडळाच्या पदाधिका-यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेवून निवेदन सादर केले. आमदार शेखर निकम यांनी राजिवली समाजमंदीरासाठी तब्बल १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button