महाराष्ट्र

कोल्हापूर विशाळगड हिंसाचारप्रकरणातील मौ.गजापूर पैकी मुसलमानवाडी ता. शाहुवाडी येथे ताताडीची मदत म्हणून प्रापंचिक साहित्यासाठी व घर दुरुस्तीसाठी शासनाकडून मदतीचे वाटप

तातडीची मदत म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रत्येकी २५ हजाराचे धनादेश सुपुर्द

कोल्हापूर – मौ. गजापूर पैकी मुसलमानवाडी ता. शाहुवाडी या गावामध्ये रविवार दि. १४ जुलै २०२४ रोजी किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त बाबतच्या मोर्च्यावेळी हिंसाचाराने मोठे नुकसान झालेले होते. मुसलमानवाडी या येथील अंदाजे ४१ घरांची जमावाने नासधुस करुन प्रापंचिक साहित्यांचे मोठे नुकसान केलेले होते. त्यामध्ये प्रापंचिक साहित्याबरोबरच घरांचेही नुकसान झालेले होते. नुकसानीबाबत विस्तृत अहवाल पंचनामे करुन शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेला आहे. वाडीमध्ये अंदाजे ५६ कुटुंबे रहातात. या ५६ कुटुंबांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून बुधवार दिनांक १७ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रत्येकी तातडीची मदत म्हणून प्रापंचिक साहित्यासाठी २५ हजार रुपये आणि घर दुरुस्तीसाठी ४१ घरांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत धनादेशाव्दारे देण्यात आली.
वाडीतील इतर सर्व नुकसानीबाबत पंचनामे करुन विस्तृत अहवाल तयार करण्यात आलेला आहे. हा अहवाल शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button