आपला जिल्हामहाराष्ट्र

केंद्रीय मंत्री रामदास आठवले ३ सप्टेंबर रोजी चिपळुणात ; कार्यकर्ता मेळावा व कोकणातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दौरा करणार महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांची माहिती

चिपळूण प्रतिनिधी - ओंकार रेळेकर

चिपळूण – केंद्रीय मंत्री रामदास आठवले दि. ३ सप्टेंबर रोजी चिपळूण दौरा करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी दिली आहे. रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ना. आठवले हे यशोधन नगर येथील दिवंगत एडवोकेट दयानंद मोहिते फाउंडेशन स्मारकाची पाहणी करतील. त्यानंतर स्व. लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह कापसाळ येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. तरी या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. मोहिते यांनी केले आहे.

रिपाई महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, चिपळूण हे मध्यवर्ती ठिकाण असून चिपळूण तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी ना. आठवले हा दौरा करत आहेत. याबाबत कोणतीही समस्या असल्यास श्री. मोहिते यांच्याशी संपर्क साधावा अथवा निवेदन देण्यात यावे असे सांगितले आहे. ना आठवले हे दयानंद मोहिते फाउंडेशनचे इमारतीच्या उद्घाटनाला सात वर्षांपूर्वी चिपळुणात आले होते. या इमारतीत अत्याधुनिक डायलेसिस मशीन, एमआरआय मशीन, सोनोग्राफी व लायब्ररी जनतेच्या सुविधासाठी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. कोरोना काळात हे काम थांबले होते. इमारत डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे श्री.मोहिते यांनी सांगितले आहे.

चिपळूण येथे भारत सरकारची आकाशवाणी बंद करण्यात आली आहे. ती सुद्धा पुन्हा सुरू करण्यात यावे तसेच चिपळूण तालुक्याच्या विकास कामासाठी भरघोस निधी ना आठवले उपलब्ध करून देतील, असे श्री. मोहिते यांनी सांगितले आहे. तरी नागरिकांनी दि. ३१ ऑगस्ट पूर्वी संदेश मोहिते (७७३८१६२२२२) या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मोहिते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button