आपला जिल्हा
देवरुख माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्येंची बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट ; भेटीत दोन समई दिल्या

संगमेश्वर – ४ ॲाक्टोबर रोजी आरोग्यवर्धिनी केंद्र बुरंबी, येथे देवरुख येथील माजी नगराध्यक्ष मृणालताई शेटे यांनी भेट दिली, व सामाजिक बांधिलकी जपत भेट स्वरूपात दोन मोठ्या, पितळी समई आरोग्यवर्धिनी केंद्र बुरंबी यांचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रायबोळे यांच्याकडे सुपूर्त केल्या. सौ.शेटे यांनी दिलेल्या या समई मधून निघणाऱ्या प्रकाशमय आठवणी सदोदित आम्हाला खूप चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील. या सुंदर भेटवस्तू बद्दल आरोग्यवर्धिनी केंद्र बुरंबीतर्फे श्री. शेटे कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार.



