आपला जिल्हामहाराष्ट्र

राहुल गांधींना खासदारकी बहाल झाल्यानंतर चिपळुणात काँग्रेसचा जल्लोष ; फटाक्यांची आतषबाजी घोषणांनी परिसर दणाणला

चिपळूण - ओंकार रेळेकर

मोदी आडनाव बदनामी प्रकरणात गेलेली खासदारकी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुन्हा मिळाली आहे. सूरत न्यायालयाच्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आज सोमवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली. त्यामुळे काँग्रेसने देशभर जल्लोष केला. चिपळूण तालुका काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या परिसरात चिपळूण तालुका काँग्रेस संपर्क कार्यालयाजवळ घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष केला.

यावेळी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेविका सफा गोठे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, यशवंत फके, चिटणीस सिकंदर नाईकवाडी, अनुसूचित जमाती विभागाचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत ऊर्फ कांता चिपळूणकर, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, उपाध्यक्ष मैनुद्दीन सय्यद, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक निवाते, नईम खाटीक, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, नियाज सनगे, जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष अश्विनी भुस्कुटे, ज्येष्ठ कार्यकर्त्या रविना गुजर, चिपळूण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष निर्मला जाधव, सचिव पूर्वा आयरे, मीरा नारकर, सेवादलच्या शहराध्यक्ष नंदा भालेकर, शहर उपाध्यक्ष विणा जावकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक भुस्कुटे, रऊफ गोठे, नंदकुमार कामत, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन मोरे, चिपळूण तालुका काँग्रेसचे सचिव शमून घारे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, प्रदेश प्रवक्ते यश पिसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबाद, सत्यमेव जयते, राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून जल्लोष केला.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button