जागतिक कन्या दिना निमित्त महिला “सधन होण्याचे मार्ग”मार्गदर्शन पर कार्यक्रम कोकण नगर येथे संपन्न

रत्नागिरी – काल दिनांक २४ सप्टेंबर रोजी जागतिक कन्या दिना निमित्ताचे औचित्य साधून माननीय नगरसेविका सौ.कौशल्या शेट्ये (कोकण नगर, रत्नागिरी) व मेहरुन्निसा साखरकर (समाजसेविका, कोकण नगर)यांच्या तर्फे कोकण नगर येथे आयोजित महिलांच्या आर्थिक सबली कारणासाठी नैसर्गिक साधन संपत्ती वर आधारित व घरगुती उद्योगावर आधारित कार्यक्रम देवरुख येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुस्तु आर्ते सर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री.युयुस्तु आर्ते सरानी कोकण नगर येथील महिलांना सक्षमीकरणा सोबतच त्यांचे घरगुती उद्योग कसे असतील याबद्दल सुचवून त्यांचे मनोबल वाढवले येणाऱ्या काळात उद्योग व्यवसायात कशी संधी प्राप्त करायची याचेही मार्गदर्शन आर्ते सरानी केले.
यावेळी रंजना कदम मॅडम, श्री.मोहमदरफी साखरकर, संगमेश्वर चे पत्रकार विशाल रापटे,श्री. धनंजय भांगे सर,श्री.प्रसाद सदलगे सर आणि भरपूर प्रमाणात महिला उपस्थित होत्या.



