आपला जिल्हा

कडवई जिल्हा परिषद गटातून भाजपकडून विनोद मस्के विरुद्ध संतोष थेराडे थेट लढत ; विनोद मस्के दोन वेळेच्या पराभवानंतर पुन्हा निवडणूक रिंगणात

संगमेश्वर – तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना ( शिंदे ) व राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी महायुतीमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहेत त्यातच कडवई जिल्हा परिषद गटाची जागा ही भाजपला सोडल्याने भाजप ने विनोद मस्के यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विनोद मस्के हे भारतीय जनता पार्टीचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांनी कडवई जिल्हा परिषद गटातून आपला संपर्क वाढवला होता त्यातच आता पक्षाने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याने ते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

विनोद मस्के यांनी २०१७ ची पंचायत समिती निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१७ च्या पंचायत समिती निवडणुकीत विनोद मस्के यांचा ३०९ मतांनी पराभव झाला होता. धामणी पंचायत समिती गणातून त्यावेळी शिवसेनेचे दिलीप सावंत विजयी झाले होते तर कडवई पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या प्रेरणा कानाल या राष्ट्रवादी पक्षाच्या ऋतूजा ओकटे यांचा १३०२ मतांनी पराभव करत विजयी झाल्या होत्या मात्र सध्या राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना फुटीनंतर रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन शिवसेना आमने सामने लढत आहेत. त्यामुळे निवडणूक निकालाची उत्सुकता वाढली आहे.

धामणी व कडवई पंचायत समिती गणातील २०२७ च्या निवडणुकीतील उमेदवार निहाय मतदान

विनोद मस्के, ( धामणी गण ) भाजप – २३०४
ऋतीका ओकटे, कडवई ( गण ) राष्ट्रवादी- १९१०
संतोष भडवळकर , ( धामणी गण ) राष्ट्रवादी १३३८
सुधीर इंदुलकर , ( धामणी गण ) अपक्ष २१३
सुशील पवार . ( धामणी गण ) मनसे १९९
दिलीप सावंत , ( धामणी गण ) शिवसेना २६१३
साक्षी विंझळे , ( कडवई गण ) भाजपा १३०४
प्रेरणा कानाल ( कडवई गण ) शिवसेना ३२१२

कडवई जिल्हा परिषद गटातून २०२७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे संतोष थेराडे हे २१०१ मतांनी निवडून आले होते . भाजप चे उमेदवार सुर्यकांत साळुंख आणि शिवसेनेचे संतोष थेराडे यांच्यात झालेल्या थेट लढतीत शिवसेनेचे उमेदवार संतोष थेराडे यांनी भाजपचे उमेदवार सुर्यकांत साळुंखे यांचा २१०१ मतांनी पराभव केला होता

कडवई जिल्हा परिषद गटातील २०१७ चे मतदान

संतोष थेराडे , शिवसेना ५७६७
सुर्यकांत साळुंखे, भाजपा ३६६६
राजेंद्र सुर्वे , राष्ट्रवादी ३०५२
जितेंद्र चव्हाण, मनसे ८२५

कडवई जिल्हा परिषद गटातून जाहीर केलेले भाजप चे उमेदवार विनोद मस्के यांनी २०२२ ची शृंगारपूर ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत विनोद पवार यांनी विनोद मस्के यांचा १५ मतांनी पराभव केला होता. दोन वेळा पराभूत झालेले भाजपचे उमेदवार विनोद मस्के हे तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावण्यासाठी कडवई जिल्हा परिषद गटातून शिवसेना ( उबाठा ) चे उमेदवार संतोष थेराडे यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे संतोष थेराडे यांचा कडवई जिल्हा परिषद गटात चांगला जनसंपर्क आहे.या लढतीत कोण बाजी मारते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कडवई जिल्हा परिषद गटातून संतोष थेराडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील त्यांच्या विरोधातील उमेदवार पराभवाची हॅट्रिक साधतील आम्ही जोमाने काम करत आहोत.
ग्रामपंचायत निवडणुकीत धनशक्ती चा वापर करुन ही जनतेने आम्हाला कौल दिला आता या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनता आमच्या पाठीशी राहील हा विश्वास आहे.

विनोद ( बाबू ) पवार
सरपंच, ग्रामपंचायत शृंगारपूर

Related Articles

Leave a Reply

Back to top button