आपला जिल्हा
भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांच्या उपस्थितीत परीणीता सावंत यांची भाजपा महिला मोर्चा आघाडी लांजा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

लांजा – उद्योजिका परीणीता सावंत यांनी भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांच्याकडे लांजा तालुका महीला आघाडीची धुरा सोपवण्यात आली आहे.
भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांच्या नेतृत्वाच लांजा – राजापूर – साखरपा मतदारसंघात भाजप संघटना मजबूत करण्यात येत असून उद्योजिता परीणीता सावंत यांना नियुक्ती पत्र देताना भाजप नेत्या तथा लांजा – राजापूर – साखरपा विधानसभा निवडणूक सह प्रमुख उल्का विश्वासराव, तालुका अध्यक्ष चंद्रकांत जी मांडवकर, जिल्हा सरचिटणीस अमितजी केतकर, सुरेश शेठ गांधी, संतोष चव्हाण सर, श्रीकांत दादा ठाकूरदेसाई, सुरेश गांधी, कमलाकर शिवगण , प्रथमेश बेंडल इत्यादी पधाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



