आपला जिल्हाकोरोना

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा प्रवेश; तीन रुग्ण आढळले

रत्नागिरी – कोरोनाचा रत्नागिरी जिल्ह्यातही पुन्हा एकदा प्रवेश झाला आहे. २७ डिसेंबर २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे तीन रुग्ण आढळून आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तिन्ही रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत, असे त्या अहवालात म्हटले आहे.

हे रुग्ण जेएन वन व्हॅरिएंटचे आहेत का याबद्दलचा उल्लेख मात्र त्या अहवालात करण्यात आलेला नाही.रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत १५५ जणांच्या करोना चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. त्यात आज केलेल्या ८९ जणांच्या चाचण्यांचा समावेश असून, त्यापैकी तिघांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button