आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ( उबाठा ) गटाकडून रोहन बने रिंगणात ? मातोश्रीवरुन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

 

आरवली :- चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ( उबाठा ) गटाकडून उमेदवार निश्चित करण्यात आल्याचे बोललो जात असून शिवसेना ( उबाठा ) गटाकडून विधानसभा मतदारसंघासाठी रत्नागिरी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांचे नाव निश्चित केले असल्याचे सांगितले जात असून तशा सूचना कार्यकर्त्यांना मातोश्रीवरुन दिल्याचे बोलले जात आहे. विभानसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदार संघांतील कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी कार्याकर्त्यांना दिले आहेत ?.

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात २०१४ साली शिवसेनेचे सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम यांच्यात थेट लढत झाली होती या निवडणुकीत सदानंद चव्हाण यांना ७५ हजार ६९५ तर शेखर निकम यांना ६९ हजार ६२७ मते मिळाली होती ६०६८ मतांनी सदानंद चव्हाण यांनी शेखर निकम यांचा पराभव केला होता.

चिपळूण मधील राजकीय परिस्थिती बदलली आणि २०१९ ला पुन्हा शिवसेनेचे सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम यांच्या थेट लढत झाली या लढतीत सदानंद चव्हाण यांना चिपळूणातून फटका बसला. भास्कर जाधव शिवसेनेत आल्याने सदानंद चव्हाण विजयी होतील अशी अटकळ बांधली जात होती मात्र शेखर निकम यांनी भाकरी फिरवली आणि चिपळूण सह संगमेश्वर मध्ये मोठी आघाडी घेत विजय मिळवला २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांना ७४ हजार ६५४ मते मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या शोखर निकम यांना १ लाख ७१ हजार ६५४ मते मिळाली शेखर निकम यांनी ९७ हजार इतक्या विक्रमी मतांनी पराभव केला होता. त्यावेळी भास्कर जाधव चिपळूणातून शिवसेनेत सक्रीय होते आता शिवसेना ( उबाठा ) गटाकडून चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव आणि रत्नागिरी जिल्हा परीषद माजी अध्यक्ष रोहन बने यांना उतरवले जाण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आदेश असले तरी निवडणूकीत जिल्ह्यातील शिवसेना नेते किती ताकदीने उभे राहतात यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चिपळूण – संगमेश्वर मतदारसंघासाठी रोहन बने यांच्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असले तरी कार्यकर्त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे तर शिवसेना ( शिंदे गट ) उपनेते सदानंद चव्हाण यांनी साथ सोडली आहे तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत देखील शिंदे गटात गेल्याने चिपळूण – संगमेश्वर मतदरासंघातील कार्यकर्त्यांना आधार असलेले नेते शिंदे गटात गेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्याना संघटना आणि संघटनेचे निवडणूक चिन्ह सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे इंद्रधनुष्य पेलवावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button