आपला जिल्हा

अहील्याबाई होळकर महीला मंडळ आयोजित हळदीकुंकू आणि आरोग्य शिबीर संपन्न

पुणे – प्रकृति फाउंडेशन कडून अहिल्याबाई होळकर महिला मंडळ ,येरवडा आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. शमा राठोड यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि सामाजिक दृष्टिकोनातून काम केले. ५० पेक्षा जास्त महिलांचे चेकअप करण्यात आल्यावर असे लक्षात आले की महिला आपल्या आरोग्याविषयी जागरूक नाहीत. ज्याना आजार आहेत अशा महिलांना बी पी , अनिमिया , शुगर, थायरॉईड , कैंसर , मानसिक आजार संशयित रुग्णांना पुढील तपासणी कुठे करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या सर्व महिला अतिशय कष्ट करणाऱ्या असून काही महिला घरकाम करणाऱ्या आहेत. या आरोग्य तपासणीचे आयोजन मिलन जंगम – गुरव यांनी प्रकृति फाउंडेशन तर मनीषा बावधने यांनी अहिल्याबाई होळकर महिला मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून केला.या कार्यक्रमात सुरुवातीला महिलांना नियमित आरोग्य तपासणी किती महत्त्वाची असते याबाबत मिलन गुरव जंगम यांनी मार्गदर्शन केले.प्रकृति फाउंडेशन महिला आरोग्य , सक्षमीकरण आणि पर्यावरण याबाबत जागरूकपणे कोणते उपक्रम करते याबाबत त्यानी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button