आमदार शेखर निकम होणार मंत्री ; राष्ट्रवादी च्या गोटातून हिरवा कंदील ?

संगमेश्वर :- चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पाडणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. राष्ट्रवादीचे ( अप ) अध्यक्ष अजित पवार यांच्या सत्ता परीवर्तनाच्या वेळी साथ दिलेले शेखर निकम हे त्यांचे विश्वासू सहकारी आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी (अप ) गट संघटना वाढीसाठी शेखर निकम यांची मदत मिळणार असल्याने त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता अधिक आहे. शेखर निकम यांना मंत्रिपद भेटणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून २०१९ आणि २०२४ सलग दोन वेळा आमदार झालेल्या शेखर निकम यांनी अजित पवारांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांचा संयमी स्वभाव आणि संघटनात्मक काम लक्षात घेऊन त्यांना मंत्रीपद मिळेल असे राष्ट्रवादी च्या गोटातून सांगण्यात आले.



