आपला जिल्हा
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पुर्वतयारीसाठी मंत्रालयात आढावा बैठक

मुंबई – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रालयात स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, गृह आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिन हा अतिशय महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी एक आहे. हा सोहळा साजरा करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर प्रत्येक बाबीचे काटेकोर नियोजन करावे, कुठेही नियोजन चुकणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिले.



