आपला जिल्हा

खेर्डी येथे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम सपन्न ; कार्यक्रमात ५०० महिलांचा सहभाग

चिपळूण – दिशा फाउंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे लाडके नेतृत्व आमदार शेखर निकम सर यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि. 2 मार्च रोजी सुप्रसिद्ध सिने अभिनेते व न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सर्वेसर्वा श्री. क्रांतीनाना मळेगावकर व बाल अभिनेत्री सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टरचा खेळ काल खेर्डी येथे रंगला. राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस व जिल्हा बँक संचालिका दिशाताई दाभोळकर तसेच खेर्डीचे माजी सरपंच दशरथशेठ दाभोळकर तसेच आमचे मार्गदर्शक अनिलशेठ दाभोळकर , नीनाताई दाभोळकर, माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे व त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले होते.मनोरंजनाने भरलेल्या या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जवळपास 500 महिलांनी या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन आनंद लुटला तर जवळपास पंधराशे प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमात 50 वेगवेगळी उत्कृष्ट बक्षीसांची लय लूट करण्यात आली.अंतिम पाच विजेत्या महिलांना पाच पैठण्यांनी गौरविण्यात आले.प्रथम पैठणी विजेती देविका शिंदे,द्वितीय पैठणी विजेती स्वरा शिंदे ,तृतीय पैठणी विजेती तेजस्विनी भुरण ,चतुर्थ क्रमांक सिया चव्हाण तर पाच क्रमांकाची विजेती प्राप्ती शिगवन ठरली.हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिनजी भोसले,ग्रामपंचायत सदस्य राकेश दाभोळकर ,ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरटकर ,ग्रामपंचायत सदस्य प्रणालीताई दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्य रशिदाताई चौघुले, ग्रामपंचायत सदस्य ओवी ताई शेट्ये, विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे ,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाभोळकर तसेच तनवीर खेरटकर,मोबीन माटवणकर, संभाजी यादव, धनंजय दाभोळकर ,सोहम दाभोळकर ,चिन्मय दाभोळकर,साईराज सावंत ,भाऊ देवरुखकर ,वैभव गुरव, संदीप सुर्वे ,सम्राट भोसले ,विकास पवार,वैभव महाडिक,अजित खोचेडे या कार्यकर्त्यांनी आणि कोमल भोसले, पल्लवी कदम, रश्मी दाभोळकर ,माधुरी यादव, विनिता यादव ,वृषाली यादव ,गीता दाभोळकर, मीनाताई दाभोळकर या महिला कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष पूजाताई निकम तसेच राष्ट्रवादी रत्नागिरी जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिशाताई दाभोळकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नेहाताई जाधव, मंडणगडच्या नगरसेविका प्रियांकाताई लेंडे ,प्रीतीताई जैन तसेच लोकरे मॅडम, चिपळूण शहराध्यक्ष आदितीताई देशपांडे, चिपळूण शहर अध्यक्ष मिलिंदशेठ कापडी, क्षेत्राध्यक्ष मनालीताई जाधव, पुनमताई भोजने आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button