आपला जिल्हामहाराष्ट्र
मुंबई – गोवा महामार्ग आंदोलनाला संगमेश्वर पत्रकारांचा पाठींबा ; संगमेश्वरातील पत्रकारांच्या तीने संगमेश्वर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
देवरुख प्रतिनिधी - सुरेश सप्रे

मुंबई – गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि तब्बल 12 वर्षे रखडलेलं महामार्गाचं काम याचा निषेध करण्यासाठी रायगडमधील पत्रकार 9 ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन करीत आहेत.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील मराठी पत्रकार परिषद व सर्व संघटनांनी तालुक्याच्या तहसीलदार अमृता साबळे यांना महामार्गाच्या संदर्भात निवेदनं देऊन रायगडमधील पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. तसेच आपल्या भागातील खासदार, आमदार, मंत्री यांना SMS पाठवून आपला संताप केला..
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सप्रे.यांचेसह सुरेश करंडे. निलेश जाधव. सागर मुळे. मिथुन लिंगायत. चिंतामणी सप्रे उपस्थित होते



