आपला जिल्हा

देवरूख आगारात बीएस ६ ही नवीन बस दाखल; आपलं देवरुख सुंदर देवरूख ग्रुपने पालकमंत्री उदयजी सामंत यांची घेतली होती भेट

निलेश जाधव - देवरूख

देवरूख – देवरुख आगारात बीएस ६ ही नवीन बस आज गुरूवारी सायंकाळी दाखल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. आपलं देवरुख सुंदर देवरूख ग्रुपच्यावतीने पालकमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेऊन देवरूख आगाराला बीएस ६ ही बस मिळावी अशी विनंती करण्यात आली होती. या भेटीचे फलस्वरूप देवरूख आगारात बीएस ६ ही बस आज दाखल झाली आहे.

आपलं देवरुख सुंदर देवरुखच्यावतीने आपण चार दिवसांपूर्वीच पालकमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेण्यात आली होती. या भेटीचे फलस्वरूप आज बीएस ६ ही नवीन देवरूख आगारात दाखल झाली आहे. ही बस आज गुरूवारी देवरूख अगारात दाखल होताच आपलं देवरुख सुंदर देवरुख या ग्रुपच्यावतीने या बसचे हेमंत तांबे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले. यावेळी अभिजीत शेट्ये, मुन्ना थरवळ, प्रफुल्ल भुवड, निखिल कोळवणकर आदिंसह एसटीप्रेमी उपस्थित होते. देवरूख आगारात बीएस ६ ही नवीन बस दाखल झाल्यानंतर आता आगाराला इलेक्ट्रिक बस मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button