आपला जिल्हा

सह्याद्रीत दीपोत्सव साजरा

सावर्डे -शांतपणे तेवणाऱ्या दीपमालिकेच्या मंद प्रकाशातून साकार होणारा दीपोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीमधील एक सुंदर आनंद उत्सव असतो.हा दीपोत्सव सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.गोविंदरावजी निकम साहेब यांच्या स्मृतिगंध या स्मारकस्थळी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड,ज्येष्ठ संचालक मारुतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे,सेक्रेटरी महेश महाडिक, उद्योजक प्रशांत निकम, प्रदीप निकम,पंचायत समिती माजी सभापती पूजा निकम, सावर्डे ग्रामपंचायत सरपंच समीक्षा बागवे, परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत भारतीय संस्कृतीची जाणीव तरुणांना करून देण्यासाठी गेली सलग पंधरा वर्षे दीपोत्सव मोठ्या उत्साहाने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने साजरा केला जातो. दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने व फटाक्यांच्या प्रकाशाने स्मृतिगंध हे समाधी स्थळ उजाळून निघालेले होते. या मनमोहक दृश्याचा व अवकाशातील दिव्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button