शिवसेना साखरपा – कोंडगाव पंचक्रोशी आयोजित मंगळागौर व नवदुर्गा मानसन्मान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

साखरपा – शिवसेना साखरपा-कोंडगाव पंचक्रोशी आयोजित मंगळागौर व नवदुर्गा मानसन्मान कार्यक्रम येथील कबनूरकर हॉलमध्ये नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे, सौ सोनम शेटे, सौ नेत्रा शिंदे, सौ नेहा सावंत उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या आयोजक सौ.भाग्यश्री संजय सुर्वे यांनी दीप प्रज्वलन व विधीवत पूजा करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक जिजाऊंच्या लेकी कोंडगाव, द्वितीय क्रमांक केदारलिंग भडकंबा, तृतीय क्रमांक हिरकणीच्या लेकी कोंडगाव बाईंगवाडी यांनी पटकावला. या स्पर्धेसाठी एकूण सहा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये मैत्री ग्रुप मुरलीधर आळी, कुलस्वामिनी ग्रुप, हिरकणीच्या लेकी कोंडगाव बाईंगवाडी, केदारलिंग ग्रुप भडकंबा, जुगाई ग्रुप किरबेट यांनी सहभागी होऊन आपली कला प्रेक्षकांना दाखवली.
प्रथम आलेल्या तीन स्पर्धकांना आयोजक सौ. भाग्यश्री सुर्वे, सौ शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर स्पर्धकांना उत्तेजनार्थ म्हणून योग्य रक्कम सन्मानचिन्ह देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच नवदुर्गा मान सन्मान सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील सन्मानास पात्र असणाऱ्या 20 महिलांची ओटी भरून सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ.गौरी लिंगायत यांनी काम पाहिले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नेत्रा शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संजय सुर्वे, हेमंत सावंत, सागर शिंदे व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.



