आपला जिल्हा

आंगवली रेवाळेवाडी येथील जि. प. शाळा व अंगणवाडीची संरक्षक भिंत कोसळली..

संगमेश्वर - मिथून लिंगायत

 

संगमेश्वर – तालुक्यातील आंगवली रेवाळेवाडी येथील जि. प. शाळा व अंगणवाडीला लागून असणारी कंपाउंड वॉलला असणारी संरक्षण भिंत सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोसळली आहे. यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीला धोका निर्माण झाला आहे.

तात्काळ सदरची भिंत बांधल्यास होणारा धोका टाळता येईल. या घटनेची माहिती मिळताच आंगवली गावच्या सरपंच अरुणा संतोष अणेराव आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली.

संबधीत खात्याकडे पाठपुरावा करणार व सदर प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सरपंच यांनी उपस्थितांना सांगितले..

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button