आपला जिल्हा

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आकले चोरगेवाडी येथील सभागृहाचे उदघाटन.

चिपळूण - विलास गुरव

चिपळूण – आकले चोगरेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखरजी निकमसर यांच्या कडे चोरगेवाडी मंदिरासाठी सभागृह बांधुन मिळावा याबाबत मागणी केली होती व ती मागणी पुर्ण झाल्यानंतर आकले गावातील ग्रामस्थ, चाकरमानी यांनी मनापासून धन्यावाद मानले. या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात चाकरमानी वर्गाची उपस्थिती लक्षणिय होती. यावेळी गावातील ग्रामस्थ यांनी आमदार महोदया यांचे मनारपासून आभार मानले व एक चांगल्या प्रकारचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी स्वप्नील शिंदे यांचे ही कौतुक केले. या प्रसंगी आमदार म्हणाल की, गेली अनेक वर्ष आकले चोगरवाडी येथील ग्रामस्थ त्याच बरोबर गाव हा ठाम माझ्यापाठी उभा आहे याची आठवण करुन दिली तसेच दिलेला शब्द पाळणे हे सुध्दा माझे कर्तव्य आहे असे म्हणाले. विकास कामे होत असतात परंतु आजचे काम देखील महत्वाचे असल्याचे आमदार महोदय म्हणाले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण तालुकाध्यक्ष अबु ठसाळे यांनी देखील शुभेच्छा देताना मनापासून आमदार साहेबांच्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला आमदार शेखरजी निकम सर, तालुकाध्यक्ष अबु ठसाळे, स्वप्नील शिंद, विजय टाकळे, भाऊ जागुष्टे, आबा शिंदे, नरसिंगराव शिंदे, पांडुरंग शिंदे, अँड. अमित कदम, राहुल शिंदे, दिनेश शिंद, गणेश गजमल, विनेश माहिते, संभाजी चव्हाण, विनायक कदम, राजाभाऊ देवरे, बाळाराम मार, संदिप कदम, संतोष सावंत, प्रकाश पवार, अशोक मालुसरे, दत्ताराम माट, लक्ष्मण कदम, सुरेश कदम, रमेश गायकवाड, प्रकाश पवार, बळीराम मोरे, सोनाली कदम, नितेश निकम, विश्वनाथ शेटये, शैलेश पवार, शेखर पवार, ग्रामपंचायत सदस्य व चाकरमानी असंख्य प्रमाणात व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button